Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dhanesh Jukar

Others

3  

Dhanesh Jukar

Others

हिशोब मांडता मांडता

हिशोब मांडता मांडता

1 min
397


भव्य काही घडवता घडवता

खुप काही बिघडलं

जगासमोर हसता हसता

रडू उगाच कोसळलं


नाव पैसा कमावता कमावता

कळलंच नाही काय गमावलं

घरं बंगले बांधता बांधता

घरपणचं घरांचं हरवलं


अतुल्य काही बनवता बनवता

दुनियेने या चांगलंच बनवलं

दुनिया सारी जिंकता जिंकता

स्वत्व नकळत हरवलं


सतत पुढे पळता पळता

जग पुढे निघून गेलं

मागे वळून पाहता आता

मागचंही सारं पुसून गेलं


जीवनअर्थ कळता कळता

जगणं सारं संपून गेलं

हिशोब जीवनाचा मांडता मांडता

गणितच सारं बदलून गेलं


Rate this content
Log in