देवा थोडं थांब
देवा थोडं थांब
1 min
302
घर थोडं आवरून येतो
स्वतःला थोडं सावरून येतो
कशात अडकलंय कळत नाही
मन तुझ्याकडे वळत नाही
तसं मन इथंही लागत नाही
पण खेळ संपता संपत नाही
थोडा वेळ लागेल मला
सारे बंध पाश सोडावयाला
जन्मोजन्मीच्या गाठी गुंतल्या आहेत
हृदयात, आतड्यात रुतल्या आहेत
पण तुला भेटायची लागली आहे आस
होऊ देत पुरे लवकर तूच दिलेले श्वास
तोपर्यंत तू दिलेली भूमिका पार पाडतो
पडदा पडेपर्यंत रंगभूमीवर तुझ्या बागडतो
म्हणशील तेव्हा सहज शांत एक्झिट घेतो
सर्व पात्रांचे निरोप घेऊन तुझ्याजवळ येतो
