दुसरी भवानी तलवार
दुसरी भवानी तलवार
1 min
424
भवानीमाता प्रसन्न झाली
एका भक्ताला,
म्हणाली...
काय हवं तुला,
तो म्हणाला...
क्षात्रतेज ललकारणारी,
यवनरक्त पिणारी,
प्रलयंकारी, जयकारी,
हिंदवीराज्य स्थापन करणारी,
आणखी एक तलवार...
तुजजवळ नाही का गं माते?
माता म्हणाली,
आहे रे बाळा आहे
दुसरी तलवार आहे...
पण,
मी वाट पाहते आहे
शिवबाची...
त्या मनगटाची !
तिची प्रखरता पेलणाऱ्या
त्या तेजाची !
मी शोधते आहे.....
येईल का रे तो ?
शिवबा आला की
देईन तलवार
मी वाट पाहते आहे
येईल का रे तो
