नातं बहिणीचं
नातं बहिणीचं

1 min

148
बहिणीचं नातं
प्रेमगीत गातं
काळजीचा हात
प्रीत जन्मजात
पहिलीवहिली सखी
नित्य स्तुती मुखी
खरी ती पाठराखी
पाखर मयुरपंखी
पुढची वा पाठची
असते जिवाभावाची
संदुकच गुपितांची
साऱ्या सुख-दुःखांची
सान थोरा जपाया
कष्टविते काया
असीम ती माया
नमू तिच्या पाया