STORYMIRROR

Dhanesh Jukar

Others

4  

Dhanesh Jukar

Others

चला.. हे ही वर्ष सरले

चला.. हे ही वर्ष सरले

1 min
338

इतिहासाचे एक पान भरले

आठवणीत काही क्षण उरले, चला.. हे ही वर्ष सरले

संकल्प किती होते सोडले

एक एक करून ते मोडले, चला.. हे ही वर्ष सरले

डाएट तोडून वेगवेगळे चरले

जिम, योगाही सगळे हरले, चला.. हे ही वर्ष सरले

नवीन बरेच काही कळले

कळले, पण नाही वळले, चला.. हे ही वर्ष सरले

दुसऱ्यातले उणे मात्र शोधले

सवयीने उगा जगा उपदेशिले, चला.. हे ही वर्ष सरले

मन फितुर अनेकदा चळले

धुतले कितीदा तरीही मळले, चला.. हे ही वर्ष सरले

वय वर्षाने नकळत वाढले

लोका सांगाया पावसाळे काढले, चला.. हे ही वर्ष सरले

आणि नको ते नेमके घडले

पुढील वर्षाचे स्वप्न पडले

स्वतःत बदल झालेले दिसले

स्वप्नात मन पुन्हा फसले

आनंदात मन आरामात झोपले

चला.. हे ही वर्ष सरले... 


Rate this content
Log in