STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

माणुसकी

माणुसकी

1 min
358

त्या माणसात

माणुसकी हवी

एकी व्हावी नवी

सर्व जनात ....


एकमेकांनी

करावी मदत

धरावी संगत

एकदुजांनी ....


एकमेकांशी

संबंध ठेवावे

हसून वागावे

त्या माणसांशी ....


मनी नसावे

हेवे अन् दावे

कशाला करावे

मनात कावे ....


माणुसकीचे

दर्शनच व्हावे

धडे गिरवावे

सदाचारीचे .....


पैसा मिळावा

उदरनिर्वाहा

करू नये स्वाहा

दुज्या घास द्यावा ....


स्वार्थाची वृत्ती

मनाची नसावी 

लाज बाळगावी

भ्रष्टाची कृती ....


सोडून द्यावा

स्वार्थ, लोभीपणा 

माणुसकी कणा

अंगी बाणावा ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational