STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

आज अचानक

आज अचानक

1 min
273

आज अचानक भेटला तो पुन्हा 

म्हणाला ओळखलस का ग मला?

सरलेल्या या सालांमध्ये 

आठवलेस का कधी मला?

गालात हसत ती म्हणाली 

अरे वेड्या विसरले होते कधी तुला

काळ जरी सरला इतका

मनाच्या कुपीत जतन केल होतं तुला 

तोही मग गालातच हसला

नदीच्या काठावर अलगद बसला 

बोलला तिला पाहून 

का ठेवलस ग आठवणीत मला

परत भेटू अस वाटल का तूला?

तीही सावरून बसली सोबत 

अन् म्हणाली अरे असं कुठे असतं का

मनातल्या गोष्टी विसरत नाहीत 

मनातून बाहेर काढल्या 

तरी त्या पसरत नाहीत

तो पाहतच राहिला तिला

विचारांचा दागिनाच जणू

मिळाला होता तिला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational