द्रोण काव्य
द्रोण काव्य
किती समजवावे स्वतःला तू सोडू नकोस ना आशा
होईल तुझेही बरे पदरी न पडता निराशा
एक मात्र कर नेहमी विचार चांगले ठेव
प्रयत्नांती तुझ्यासाठी धावून येईल देव
चांगल्या विचारांनी बदलशील तू जग
उंच हाताने कवेत घेशील ना ढग
काहीही झालं तरी मानू नको हार
जीवाला कधीच लावू नको फार
संकटकाळ येतो आणि जातो
सहनशक्तीवाला राहतो
प्रयत्न सोडू नये कधी
विचारांची घ्यावी व्याधी
करत जावे कर्म
जपावाच धर्म
नसे लाचार
सु विचार
ठेवावे
मनी
तू...
