"आई " घेऊ दे मला जन्म
"आई " घेऊ दे मला जन्म
"आई" घेऊ दे मला जन्म
मी सोडविन तुझ्या प्रश्नाचे कोडे
आई आपल्या घराच्या अंगणी
पाऊल पडू दे माझे थोडे
सांगीन तुझ्या वेदना
घेऊ दे मला जन्म
तुझ्या बंद असलेल्या ओठात
काय सुरू आहे बोलण
मुली जन्मा न येऊ देण्याचे
कोण्या सैतानाचे कपट
तोडील मी ते बंधन
म्हणून, मला घेऊ दे जन्म
सांगीन कहाणी साऱ्या जगाला
जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाईच्या लेकीला
घेईल जन्म थोर कन्या म्हणूनी
वंशाचा दिवा होईल तुझ्याच दारी
