भुकेचा वणवा
भुकेचा वणवा
भोवताली पेटला भुकेचा वणवा आहे
आज ही गाव अक्षरांना मुकला आहे
सूर्य उगवताच उपाशी प्रश्न येतात दारा
रोज स्वप्नांचे भीक त्याला घालते आहे
जातीच्या नावाने छेडिले ज्यांना इथे
कोणती परीक्षा देणे त्यांचे बाकी आहे
डाव रचले किती तुम्ही उंची गाठायला
दान सर्व देऊन शेवटी कर्ण श्रेष्ठ आहे
व्हायला हवा पुन्हा बुद्ध जन्म इथे
सारेच इथे अंगुलीमाल झाले आहे
