STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational Others

3  

SWATI WAKTE

Inspirational Others

एकलव्य

एकलव्य

1 min
341

एक होता एकलव्य

बालक होता तो दिव्य

जिद्दी तो बालक असती 

द्रोणाचार्यला विनवती

माझे व्हा तुम्ही गुरु

धनुर्विद्या करू सुरु

तुला नाही शिकण्याचा अधिकार

असे म्हणून द्रोणाने दिला नकार

जिद्दी तो बालक भारी

घडवली द्रोणाची मूर्ती न्यारी

स्मरून रोज द्रोणाचार्या 

एकाग्रतेने करी स्वाध्याय दिनचर्या 

झाला धनुरविद्येत स्वतः पारंगत

श्रेय द्रोणाचार्या दिले फुकट

दाखवून कौशल्य द्रोणाना 

चकित केले सर्वांना

गुरुदक्षिणा मागी द्रोण

एकलव्य तयार खुश होऊन

दिला उजव्या हाताचा अंगठा कापून

क्षणार्धात गेले सर्व सम्पून

आयुष्यात नाही पकडता आला बाण 

पण एकलव्य झाला अजरामर महान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational