STORYMIRROR

Shivam Madrewar

Inspirational Others

3  

Shivam Madrewar

Inspirational Others

एक दिवा !

एक दिवा !

1 min
365

प्रश्न आहे प्रत्येकाच्या काळजीचा,

लोभ नाही तीला कशाचा,

सोहळा आहे तो जन्मदात्रीचा,

आणि एक दिवा त्या आईचा.


हात मिळाला बाबांना आधार देण्याचा,

तिकीट आहे तिच्याकडे मोज-मस्ती करण्याचा,

हक्क आहे तीला दादासोबत भांडण्याचा,

आणि एक दिवा त्या बहीणीचा.


श्वास घेतला तीने काळ्या मातीच्या सेवेचा,

अंत:करणातून नाश करते ती भुकेचा,

साक्षात रुप आहे ती अन्नपुर्णेचा,

आणि एक दिवा त्या शेतकरीणचा.


पुष्प गुंफला तीने शब्दांचा,

विकास झाला त्या पर्वाचा,

लेखणीने सोडविला मार्ग त्या युध्दाचा,

आणि एक दिवा त्या लेखिकेचा.


वाद आहे विज्ञानाच्या भविष्याचा,

दोश कळाला त्या अंधश्रद्धेचा,

सुटला प्रश्न प्रदूषित वसुंधरेचा,

आणि एक दिवा वैज्ञानीकेचा.


दरवाजा ठोठावला तीने ज्ञानाचा,

संपावला अंधार तीने तीनही घरांचा,

दिपक धरला हाती तीने शिकवणीचा,

आणि एक दिवा त्या शिक्षीकेचा.


शेवट आला आहे जुलमी व्यसनाचा,

तीव्रतेने विरोध केला तीने अन्यायाचा,

ईश्वराने सार्थक केला तीच्या जन्माचा,

आणि एक दिवा त्या प्रत्येक स्रीचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational