टी. व्ही. चे परिवर्तन
टी. व्ही. चे परिवर्तन
1 min
187
छोटा होता टी व्ही आधी
मोठा त्याचा अँटीना
ब्लॅक अँड व्हाईटच होता तो
पण त्याला काच लावून रंगीत
मजा यायची बघताना
कार्यक्रम होते मोजकेच
बघण्यात यायची मजा
आला रंगीत टीव्ही
छोटा झाला अँटीना
व्ही सी आर आणून रात्र जागण्याची
भारी असायची मजा
आले केबल घरी
गायब झाला अँटीना
कार्यक्रमाचा झाला भाडीमार
गोंधळ व्हायचा बघताना
आता तर आहे टी व्ही स्मार्ट
करमणूकीसोबत मिळते ज्ञान
परिवर्तन हाच जगाचा नियम
त्याला स्वीकारणे हेच शहाणपण