सांगेल का कुणी? नंतरचे आयुष्य
सांगेल का कुणी? नंतरचे आयुष्य
काय बाई किती म्हणून किती स्वप्न होते लग्नाचे
एखादा राजकुमार येऊन घोड्यावर
दागिन्याने मढवेल लग्नात
सुंदर होईल स्वागत समारंभ
सुंदर साडी घालून मिळेल नटावया
लग्नानंतर पुरवेल हौशी
दाखवेल जग सारे
प्रत्येक वीकएंड नेईल बाहेर
पण लग्नात घेऊन हुंडा
नवरा म्हणाला
कश्याला पाहिजे दागिने,
कश्याला पाहिजे स्वागत समारंभ
ह्या हुंड्यातून घेऊ आपण घर
नवरी म्हणाली ठीक आहे
नवऱ्याने घेतले घर कर्ज काढून
हुंड्याचे पैसे दिले आई बाबाला देऊन
झाली नाही लग्नात कोणती हौस
ना झाली आयुष्यात जगाची टूर
नवरीने विचारले हुंड्याचे पैसे होते ते माझे
नवरा म्हणाला माझ्या आईबाबाने शिकविले मला सारे
म्हणून ते दिले त्यांना सारे
पैश्याचा नाही दिला हिशोब कधी
p>
लग्नानंतर सर्व सणवार स्वतः च मुलीने केले घरी
ना पहिले सणवार सासरी केले साजरे
ना डोहाळ जेवणाचे झाले कौतुक सारे
मुलीने सोडले स्वप्नावर पाणी
घराची घेतली जबाबदारी आणि
मुलगा काढू लागला कामात चुका तिच्या
तुला तर काही येतच नाही म्हणू लागला
मुलगी प्रयत्न करू लागली सुधारण्याचा
पण कौतुकाची थाप कधीच नाही मिळाली
मुलीने सोडली अपेक्षा कौतुकाची सारी
शोधू लागली आनंद जोपासून छन्द भारी
मुलाचे आई बाबा सुरु झाले म्हातारपण
मुलगा म्हणाला ह्यांची जबाबदारी घेऊ या आपण
आता मुलीला वाटले वाईट
स्वप्नाचा केला मी माझ्या चुराडा
शोधू लागली मी माझा मार्ग आता
जबाबदारीत अडकून परत जाईल आयुष्य वाया
अशी ही कहाणी
मुलीनेच का करावा स्वप्नाचा चुराडा
सांगेल का कुणी