आजीबाईचा बटवा
आजीबाईचा बटवा
भिती नाही आम्हाला आजाराची आजीबाईचा बटवा असल्यावर घरी
तुळशीचा काढा धुनी हळदीची खोकला सर्दीवर रामबाण औषध भारी
डोकेदुखी असेल जुनी आजीबाईचा बटवा आहे ना घरी
आले सुंठाचा चहा पिऊनजाल डोकेदुखी विसरून खरी
कुठलीही जखम झाली मोठी आजीबाईचा बटवा आहे ना घरी
आंबेहळदीचा लेप लावून ठेवतीत्यानेच होती जखम बरी
आजार असो कुठलाही आजीबाईचा बटवा असल्यावर घरी
गरज काळजी करण्याची नाहीबटव्यात आहेत उपाय भारी