सुख म्हणजे नक्की काय असते
सुख म्हणजे नक्की काय असते
सुख म्हणजे कडक उन्हातुन फिरून आल्यावर
माठातले थंडेगार पाणी पिण्यात सुख असते
सुख म्हणजे गृहिणीला सर्वांचे डब्बे भरून दिल्यावर
निवांत सोफ्यावर बसून चहा पिण्यात असते
सुख म्हणजे एकटे घरात असल्यावर
आवडीचे गाणे ऐकत लोळत पडण्यात असते
सुख म्हणजे एखादे पुस्तक वाचायला घेतले
आणि ते पूर्ण वाचून झाल्यावर असते
सुख म्हणजे लेखिकेला एखादी कथा सुचली
आणि ती कागदावर उतरवण्यात असते
सुख म्हणजे एखाद्या चित्रकाराला
सुंदर चित्र काढण्यात असते
सुख म्हणजे ट्रेकरला
डोंगर चढल्यावर असते
सुखाची परिभाषा खुपच सोपी आहे
आताचा क्षण जगायला शिका त्यातच खरे सुख असते