मित्र
मित्र
द्रौपदीचा सखा कृष्ण
वाचवली अब्रु पुरवून वस्त्र
सुदामाचाही मित्र कृष्ण
दारिद्र्य घालवून जाणले कर्तव्य
अर्जुनाचाही असती तो मित्र
गीता सांगून दिले ज्ञान पवित्र
असावा प्रत्येकाला कृष्णासारखा मित्र
जो देईल साथ सर्वत्र
आपणही जाणावा मैत्रीचा अर्थ
नाही सोडावी साथ आपले कर्तव्य