STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

वसा स्त्रीशक्तिचा

वसा स्त्रीशक्तिचा

1 min
394

खचलेल्या वाटातुन मार्ग तुलाच शोधायचा

काटेरी संकटातूून तुलाच वळवायचा

        

अंधाराची भीती आता काढून टाक

कर्तुत्वाने तुझ्या तू प्रकाश पाडूूून दाव


गेले ते दिवस मागे रडत बसायचे

अबला बनून कोंडून कुडत रहायचे


पंखांंना तुझ्या स्वातंत्र्याचेे बळ दे

अपूर्ण स्वप्नांना उंच भरारी दे 


कला आहे अंगी एखादा उद्योग कर

खंबीरतेने तू सर्व व्यवहार कर 

 

कामावर तुझ्या ठाम विश्वास ठेव

तुझ्यापाशी वेळ आहे याचेे भान ठेव


टोमणे जगाचे तुला ऐकूू येतील

खेकड्या प्रमाणे पायही ओढतील


घोरपडीची पकड तुझी इतकी घट्ट कर

ओढणाऱ्यांंचे बघ तुटून पडतील कर 


स्वाभिमानाचेे शस्त्र तुझे घडव चारित्र्याने

मान झुकव हीनतेची नजरेच्या अंगाऱ्याने


हक्क तुला जगण्याचा क्षण प्रत्येक आनंदाचा

स्मरणात ठेव तुझ्या तू वसा स्त्रीशक्तीचा


स्मरणात ठेव तुझ्या तू वसा स्त्रीशक्तीचा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational