STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

आईची शिकवण

आईची शिकवण

1 min
236

लेक पुसते आईला 

जाते कसे फिरते गं

 पाळीवर पाळी घासू

 पीठ कसे दळते गं


निरागस माझा जीव

खुंटा पेलण्या अधीर

माता शिकवी हसून

जाते फिरण्याची रीत


एक पाळ माहेराची

 एक पाळ सासरची

घास स्नेहे घालुनिया

खुंटा बनू दळायची


थापू नात्याची भाकरी

अन्नपूर्णा होऊनीया 

भुकेल्या जीवाची दया 

वर देयी विठुराया 


जाते नव्हे आहे चक्र

भोवती तुझ्या फिरते

सुखदुःखाच्या फेऱ्यात

प्रेमाने खूंटा रोवते


बळकट कर हात

नाही सोपे दळायचे 

संसाराच्या फेऱ्यावर

ओवी गात जगायचे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational