STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

दिवा

दिवा

1 min
179

जिन्यातल्या दिव्यांची

निघाली रांग कुठे

काय झाली खलबत

 कशावर एकमते


विचारता मिश्किलीने

हसतच उत्तरले 

आम्हाला ठेवण्यास

तुझ्याकडे जागा कुठे


प्लॅटच्या जमान्यातील

अंगणे नाहीशी झाली

त्याबरोबर वृंदाही

पोथीत लुप्त झाली


तेवतांना चांदण्याशी

हितगुज होत असे

दिवाळीनंतर त्याच 

 तुझी काळजी घेते


आम्ही पणत्या मोजके

 दिवसच उजळतो

तुळशी पुढे तेऊनी

 समृद्धीचे दान देतो 


म्हणूनच सांगतो की

अंतर्मनात लाव दिवा 

संस्कृतीचा संस्काराचा

चिरंतन तेवणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational