आई
आई
आई तुझी गाथा
वर्णु कोण ग्रंथी
ऐसा शब्द कोठे
सांगा कोण कोषी
उपमा तूसम
धोंडोन न दिसे
चारी वेद फिके
ऋषीमुनी थके
देवाहुनी देव
नाही असा कोठे
आई सर्वश्रेष्ठ
नाही कोण मोठे
वर्षा वारा ऊन
झेललेस हाती
छत्र धरे डोई
ऊब वात्सल्याची
संजीवन पान्हा
अमृतासमान
तृप्त करी रोम
थोर उपकार
ऋण फेडू कसे
पामर मी जगी
केले किती कर्म
परी राहे उणी
