समजने...!
समजने...!
समजने वाले समज गये है...।
ना समजे वो अनाडी है....।।
किती अर्थ पूर्ण
हे आत्ता कळत
जेंव्हा जेंव्हा
आपलं पाऊल
वाकड पडत....
हे नेहमी
असच होतं
वेळेत काहीच समजत नाही
वेळेत काहीच उमजत नाही
मग
निव्वळ एरंडाचा गुऱ्हाळ
पण
खर सांगू
पश्चातापा शिवाय
यावर जालीम उपाय नाही
ठेच लागल्या शिवाय
वाटेत धोंडा आहे
हे पटत नाही
आणि
पायावर धोंडा पडल्या शिवाय
धोंडा म्हणजे नेमकं काय
हे ही कळत नाही.....
तेंव्हा तेंव्हा
वडिलधाऱ्या मंडळींची
आठवण आपोआप होते
आणि
पुढच्यास ठेच
मागचा शहाणा
म्हणजे काय
हे पटतेही आणि कळतेही...!
