STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational

4  

प्रतिभा बोबे

Inspirational

राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

1 min
658

झाले बहु होतील बहु

परि या सम हा 

छत्रपती शिवरायांनी दिला

स्वराज्याचा मंत्र महान


माता जिजाऊच्या पोटी 

झाला जन्म शिवनेरीवर 

पिता शहाजींना मिळाला 

शिवाई देवीचा वर


स्वप्न होते जिजामातांचे

स्वराज्य असावे स्वहक्काचे

नको गुलामी परक्यांची 

राज्य व्हावे न्यायाचे आणि मुक्तीचे


करावया पूर्ण स्वप्न मातेचे 

संघटन केले मावळ्यांचे

करुन अभिषेक रक्ताचा रायरेश्वराला

प्रतिज्ञा केली स्वराज्यस्थापनेची

घेऊन मावळ्यांना साथीला 


तोरण्यावर बांधले तोरण स्वराज्याचे

राजगड सजली पहिली राजधानी स्वराज्याची

मां जिजाऊ पिता शहाजींचा घेऊन आशिर्वाद

सुरु झाली घौडदौड

सुराज्य आणि स्वराज्याची


गुरु दादाजी कोंडदेवांच्या 

शिकवणीचे सार्थक हो झाले 

अफजलखानासारखे बलाढ्य शत्रू

शिवबाने लीलया मारले


बाजीप्रभू, तानाजी,बाजी

अशी जिवाला जीव देणारी 

माणसे होती पराक्रमी

स्वराज्यासाठी प्राणाची पर्वा न करणारी 


स्वराज्यात होता प्रत्येक स्त्रीचा

माता- भगिनीप्रमाणे सन्मान

जातीपातीचा नव्हता कोणताही भेद

स्वराज्यात सगळेच होते एकसमान


शिवराज्याभिषेकाचा सोहळा होता

डोळ्यांचे पारणे फेडणारा 

गागाभट्टांच्या मंत्रघोषात 

दुमदुमला परिसर रायगडाचा 


संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग म्हणून

३०० किल्ल्यांचे केले जतन प्राणपणाने

आरमाराचे जनक बनून 

दिले उदाहरण दूरदृष्टीचे


करुन वापर गनिमी काव्याचा

उडवली शत्रुची दाणादाण 

अष्टप्रधान मंडळ करुन साकार 

राज्यकारभाराची घडी बसवली छान


दुर्जनांचा कर्दनकाळ अन् लोककल्याणकारी प्रशासक

सज्जनांचा कैवारी अन् कुशल संघटक

नव्या युगाचा निर्माता अन् सावध नेते

नाही होणार राजा पुन्हा ऐसा

जसे आपले शिवछत्रपती होते


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational