STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational

3  

प्रतिभा बोबे

Inspirational

नारी तू नारायणी

नारी तू नारायणी

1 min
178

तोडून बंध जाचक रुढींचे

होऊन आरुढ प्रयत्नांच्या वारुवर

पादाक्रांत केलीस तू शिखरे यशाची

नजर तुझी तुझ्या उज्ज्वल भविष्यावर


होऊन तू लेक सावित्रीची

धरुन सये कास शिक्षणाची

तोडलेस साखळदंड अत्याचारांचे

आस धरलीस मनी स्वप्रगतीची


होऊन जिजाऊपरि धाडसी तू

गगनभरारी हरेक क्षेत्रात घेतेस

स्वबुद्धिच्या जोरावर होऊन रणरागिणी

स्वचातुर्याचे रणक्रंदन तू करते


असशी नारी तू नारायणी

जगताची धैर्यशील स्वामिनी

स्वसंरक्षणासाठी होतेस प्रसंगी

रणचंडिका तू तळपती दामिनी


नारीच्या रुपातली आहेस दुर्गाच तू

असशी जगी तू पूजनीय

करशी धैर्याने मुकाबला संकटांचा

त्रिवार नमन तुजला तू नारी वंदनीय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational