मेहंदीच्या पानावर
मेहंदीच्या पानावर
1 min
395
मेहंदीच्या पानापरी
असे स्त्री या भूमीवरी
सदा झिजे सर्वांसाठी ।
जळे जशी ही पणती
द्याया सर्वां प्रकाश ती
सदा झिजे सर्वांसाठी ।
अन्नदाता असे भूमी
स्त्री असे घरची लक्ष्मी
सदा झिजे सर्वांसाठी ।
सुगंधा झिजे चंदन
नारीस माझे वंदन
सदा झिजे सर्वांसाठी ।
स्वर्गी वंदनीय हरी
नारी असे घरोघरी
सदा झिजे सर्वांसाठी ।