Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

5.0  

Neha Ranalkar

Inspirational

विषय: ओवी सावित्रीची

विषय: ओवी सावित्रीची

1 min
1.3K


पहिली माझी ओवी गं

ज्योतिबांच्या सावित्रीला

पतीसवे समाजकार्यात

सहभाग हिरीरीने घेतला ||१||


दुसरी माझी ओवी गं

फुल्यांच्या पत्नीला

पतिकडून शिक्षणाचा

पहिला पाठ तिने गिरवला ||२||


तिसरी माझी ओवी गं

ज्योतिबाच्या सावलीला

पतीचे शिक्षण कार्य पूर्णतः

तडीस नेणा-या माऊलीला ||३||


चौथी माझी ओवी गं

ख-या त्या ज्ञानज्योतिला

बालिंकांना देऊन शिक्षण

घरोघरी ज्ञानदीप लाविला ||४||


पाचवी माझी ओवी गं 

क्रांतिज्योती सावित्रीला

अज्ञान अंधश्रद्धांशी लढा देत

दगड शेणाचा वार साहिला ||५||


सहावी माझी ओवी गं

स्रियांच्या भाग्यदात्रीला

गुलामीच्या तोडून शृंंखला

स्वाभिमान जागृत करविला ||६||


सातवी माझी ओवी गं

दत्तक यशवंताच्या आईला

पिडीत मातांच्या मुलांसाठी

अनाथाश्रम जिने चालविला ||७||


आठवी माझी ओवी गं

लक्ष्मीबाईच्या सुकन्येला

आत्महत्या,भ्रृणहत्या रोखून

केलं सुरक्षित गर्भासह मातेला ||८||


नववी माझी ओवी गं

अष्टपैलू त्या व्यक्तिमत्त्वाला

ज्ञानाई,स्फूर्तीनायिका,लेखिका

गृहिणी नि समाजसुधारकाला ||९||


कित्येक करीन ओव्या गं

स्री शिक्षणाच्या प्रणेतीला

अज्ञानरूपी अंध:कारातून

ज्ञानप्रकाशमार्ग देवविला  ||१०||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational