भारत
भारत
भारत भारत देश माझा
गणराज्य महान एक
रंगछटा बघण्या मिळते
देश एक संस्कृती अनेक
व्यापता बलाढ्य जगतात
सातवा लागतो गणित अंक
जनजीवन गणता गणता
दुसरा गाठला क्रमांक
लाभला इतिहास महाकाय
वीकसली साम्राज्य अनेक
आध्यात्मिक जोड ह्याला
वारसा जपला एकेक
विविधतेत एकता हा
मूळमंत्र हया देशाचा
भाषा,कला,धर्माने
आत्मा ओतला मनामनाचा ..
परंपरा लाभली युगान युगे
वैशिष्ट्ये हया पवित्र मातीचे
कर्म भूमी सार्थ नाव हिचे
सांगून गेले बोल संथाचे
