STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational

4  

Sunita Anabhule

Inspirational

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
346

सावित्रीमाय तूच माझी प्रेरणाज्योत......

बुरसटलेल्या विचारांवर करुन मात,

पेटवली ज्योत आमच्या मनामनात,

जागवली तू ज्ञान चेतना जनमनात,

राहिली असती तशीच खितपत अंधारात।। १

सावित्रीमाय तूच माझी प्रेरणाज्योत........सलाम


अज्ञान अंधश्रद्धेच्या ग तिमिरात,

गुरफटले होते पुरूषी वर्चस्वातं,

शेण,माती,चिखलाचे गोळे झेलत,

आमच्या उद्धारासाठी राहिलीस लढत ।। २ सावित्रीमाय तूच माझी.......सलाम


जातीपाती धर्मांधतेच्या त्या काळात,

गोठ्यातल्या ढोरापरी स्त्री होती जगत,

समाज अडकला होता जुलमी राजवटीत,

शिक्षणाशिवाय मार्ग नव्हता अशा स्थितीत।। ३

सावित्रीमाय तूच माझी प्रेरणाज्योत......सलाम


स्त्रीशिक्षण ज्योतिबाबाचं सपान होतं,

त्यांचं सपान तुझ्या डोळ्यात होतं,

अवघड काट्याकुट्यांचा मार्ग तू निवडत,

खंबीरपणे तोंड दिलेस प्रत्येक संकटात ।। ४

सावित्रीमाय तूच माझी प्रेरणाज्योत.....सलाम।।


आज आम्ही विहरतोय उंच उंच गगनात,

यशाची अनेक शिखरे केलीत पादाक्रांत,

झालोय सबला वावरतोय या समाधानात,

वाटे अभिमान तुझा वारसा जपण्यात ।।५

सावित्रीमाय तूच माझी प्रेरणाज्योत....तुला माझा सलाम।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational