STORYMIRROR

Savita Kale

Inspirational Others

4  

Savita Kale

Inspirational Others

एक पणती व्यसनमुक्तीची

एक पणती व्यसनमुक्तीची

1 min
484

आयुष्याची दशा झाली

जेव्हा त्याने नशा केली

आई-बाबांच्या संस्काराची

भर चौकात उडवून खिल्ली

संस्काराची आठवण त्याला करून देऊ

एक पणती व्यसनमुक्तीची

दारी त्याच्या लावू।।१।।


बाई आणि बाटली

कुटुंबापेक्षा बेस्ट वाटली

त्यापायी कष्टाची कमाई

पाण्यासारखी वाहिली

कुटुंबाचे महत्त्व त्याला पटवून देऊ

एक पणती व्यसनमुक्तीची

दारी त्याच्या लावू।। २।।


तोंडामध्ये भरून गुटखा

त्याला वाटे मी 'लय' भारी

रस्त्यावरती पिचकारीचा सडा

स्वच्छतेचे 'तीन तेरा' करी

स्वच्छतेचे महत्व त्याला पटवून देऊ

एक पणती व्यसनमुक्तीची

दारी त्याच्या लावू।। ३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational