आयुष्याचा खेळ हा
आयुष्याचा खेळ हा
खेळ सारीपाटाचा आयुष्य हे
सोंगटीचं घर बदलणारं आहे
बाळगून समयसूचकता टाकावा फासा
न कळताच बाजी पलटणार आहे...
प्रतिस्पर्धी नाही कोणीच इथे
खेळ आयुष्याचा एकट्याचा आहे
असो निकाल कोणताही त्याचा
जिंकला तोच इथे जो सत्याचा आहे...
खेळात आयुष्याच्या या
श्वास ही कधी कधी सोडतो साथ
नकळतपणे आपण हरलो जातो
होतो आपण या खेळातून बाद...
खेळ हा आयुष्याचा एकतर्फी
अति खडतर काठिण्य पातळीचा असतो
धरली तग ज्याने खेळात या
तोच खेळाडू इथे नक्कीच जिंकत असतो...
