थोडं चूप राहावं यार
थोडं चूप राहावं यार
शब्दाला देता शब्द
कलहाचे उजळे प्रारब्ध
दुरावती मग नाती
विरहात लोपते मती
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
काही शब्द असती तीर
ओठी असती सदा स्वार
सोडता वाचाळ तोंडून
घुसती काळीज भेदून
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
शब्द असती बलवान
प्रेमाने फुलती तन-मन
शब्दच जोडती सारी नाती
ओली होते डोळ्यांची पाती
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
शब्द दुधारी तलवार
करू नये मनावर वार
नात्यांचा करती संहार
टाळण्या व्हावे तयार
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
शब्द बोलता सहजी
बोलणारा असतो मौजी
ऐकणारा ह्रदयी जपतो
घृणाच मनी प्रसवतो
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
लाखो शब्द स्वार जीवनी
बोललो आपण बहूगुणी
का अपशब्द कुणा बोलावा
घायाळ का करावे कुणाच्या मना
म्हणून, शब्दाला जपावे फार
थोडं चुप राहावं यार!
