STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

आजोबा

आजोबा

1 min
224

शरीर कितीही थकलेल असो

मनाचा तरुणपणा अबाधित आहे

 भरभरून शिकता येतं जिथे

ते आजोबा नावाचं विद्यापीठ आहे 


अनुभवांची पोतडी सांभाळत

 नवनवे प्रयोग आजही करतात

 नातवंडांच्या मेळात आजोबाही

 धिंगाणा मस्ती करतात


वृत्तपत्राचे पानां पान वाचताना

 जगाची काळजी करतात

अज्ञानी माणसाचे मात्र

 चांगलेच कान धरतात


कसरत व्यायामावर असतो

कायम त्यांचा भर 

हवाहवासा वाटतो प्रत्येकाला

आजोबांचा वावर


शिस्तीचेे धडे शिकवत

 संस्कारांचे मळे फुलवतात 

 रुसलेल्या चेहऱ्यावर

आजोबा आमचेे कळ्या खुलवतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational