ती "... चा सन्मान
ती "... चा सन्मान
कोणत्याही क्षेत्रात सोडा मला
माझ्या परीने मी प्रयत्न करून पाहीन,
बघा इतरांपेक्षा काहीतरी
मी वेगळे करून जाईन.
मी आधुनिक काळातील स्त्री आहे
महिलांची वेगळी ओळख करून देईन.
युगानुयुगे मी पाहिले आहे, शोषित पीडित महिलांना
सन्मानाचे स्थान त्यांना समाजात मिळवून देईन
स्त्री म्हणून जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे
आई मी ताई मी पत्नी मी,समाजात माझेही स्थान आहे
जीवनात कोणतेही संकट आले तरी चालेल
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी मी राहीन
कितीही अग्निपरीक्षा घ्या माझी
मात करून त्यावर मी नक्कीच पास होईन
एक एक पाऊल प्रगतीचं बघा मी
पुढे पुढे टाकत जाईन
