जीवनाचे सार
जीवनाचे सार
1 min
221
समजून घे हे जीवनाचे सार
जीवन दोन दिवसांचा बाजार
गोंधळू नकोस होऊन बेजार
सत्याचा तू कर स्विकार
देवावर तू श्रध्दा ठेवून
मेहनत कर जीवनात फार
मित्रा काही माझं ना तुझं
सोडून दे तू व्यर्थ विचार
एकत्र राहून सर्व समाज
कर सदा भाऊबंदकीचा प्रचार
मित्रा नेहमी हसत राहा
कष्टाने जे मिळेल ते स्वीकार
नित्य नेहमीचं काम कर
राहू नको तू कधी बेकार
ईश्वर निर्मित सुंदर जग
चिंता सोड तू बिनधास्त जग
आनंदाचे अनेक प्रकार
होऊ नको तू कधी लाचार
पुढे जा तू प्रगती कर
हाच जीवनाचा खरा आधार
समजून घे जीवनाचे सार,
जीवन दोन दिवसांचा बाजार
