STORYMIRROR

Manisha Wandhare

Inspirational

3  

Manisha Wandhare

Inspirational

थोडंस हसून घे ...

थोडंस हसून घे ...

1 min
175

तोड दुःखाचे पाश ,

थोडसं हसून घे ...

अपेक्षेच्या ओझ्याला उतरवून ,

थोडसं हायसे घे ...

डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना,

दिलासा डोळ्यांचा घे ...

रडवलेले दिवस विसरून ,

थोडसं हसून घे ...

काळजी नको उद्याची ,

तू काय? करशील ,

चिंतेचा भार वाहत ,

उगाच मन उदास करशील ,

सरणाच्या काडीवरही ,

थोडसं हायसे घे ...

काहीतरी घडेल चांगले ,

थोडसं हसून घे ...

दुनियेला वैरी करून ,

नात्यांची धागे तोडली ,

इथेच जगून मरायचे आहे ,

का? ही माणसं विसरली ...

तोड दुःखाचे पाश ,

थोडंसं हसून घे ...

अपेक्षेच्या ओझ्याला उतरवून ,

थोडंसं हायसे घे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational