माणूस
माणूस
माणसाने माणसाशी माणसा सारखं वागावं
माणसाला माणसानेच माणुसकीने सांगावं
माणसाची मानसिकता माणसासारखी नाही
माणूसच माणसाला माणूस मानत नाही
माणुसघाना माणूस, माणसात राहत नाही
माणसासारख्या माणसाची माणसाला घृणा येई
माणसाळलेला माणूस माणसाला आवडतो
माणूसच माणसाला माणूस म्हणून निवडतो
माणसाच्या मानसाला मानवतेची किनार
माणूसच माणसाचा मनोमन शिलेदार
