Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Gowardhan

Inspirational

3  

Mangesh Gowardhan

Inspirational

जय महाराष्ट्र माझा

जय महाराष्ट्र माझा

1 min
206


भारतभूच्या मातीतून निपजला

सह्याद्रीचा तेजोमय राजा......

दिल्लीच्या तख्ताला शोभतो

जय महाराष्ट्र माझा........||धृ||


सह्याद्रीचे चिलखत घेऊन

भीमा कृष्णेचे अमृत पिऊन

पोलादी मनगटे जाहली...

अस्मितेच्या लढाया जिंकून

देशाचा जगी मान राखुनी

करतो गाजावाजा........||१||


पाषाणावरच्या जिवंत लेणी

तुझ्या शौर्याची कहाणी.....

चरणावरती नतमस्तक ज्याच्या

समुद्राची ही राणी........

नसानसांत रुधिरामधुनी....

गर्जतो अभिमान तुझा.....||२||


सुवर्णाक्षरांनी लिहिली ...

ज्याच्या इतिहासाची पाने........

जरी वेगळी भाषा अन बोली

तरी समतेचे नांदने......

या भूमीतून जगी गाजला

माझा शिवबा राजा....||३||


कणाकणात रुजली आहे

इथल्या प्रेमळ संस्कृती....

शेतकरी अनं कष्टकऱ्यांच्या

धारांनी भिजलेली माती

किती हुतात्मे जाहले आजवर

तव घडला हा महाराष्ट्र माझा..||४||


या मातीतून जन्म घेऊनी

धन्य जाहलो आपण......

महाराष्ट्राची गौरवगाथा...

करूया मिळून जतन...

एकमुखाने गाऊ सारे..

गर्जा महाराष्ट्र माझा...||५||


Rate this content
Log in