अवकाळी
अवकाळी
*भरलेले रांजण करून रिकामे घरचे*
*भेटीला धरतीच्या येतोस अवेळी.....*
*असं कसं तुला कळत नाही मित्रा*
*बेभान बरसतोस असा अवकाळी ||धृ||*
*ठरली आहे ना वेळ तुझी....*
*कधी यायचं आणि कधी जायचं*
*आसुसलेल्या धरतीला या..*
*ओलचिंब न्हाऊ घालायचं...*
*मग कसा आलास तू....*
*अचानक यावेळी......* *||१||*
*तुझें माझे नाते दोस्ता......*
*आहे किती घनिष्ट......*
*नाही आलास बोलावून तुला*
*तर जातात वाया माझे कष्ट*
*वाट पाहत असते तुझी...*
*जनता ही भोळी....* *||२||*
*असा कसा वागतोस*
*आजकाल*
*तू कळतं नाही आम्हाला....*
*किती विनवणी करायची तुझी*
*ये बोलावलं तेव्हाच तुला*
*माराही करतोस गारांचा..*
*भांबावली जनता सगळी* *||३||*
*वादळ वारा घेऊन संगे...*
*पिकांना लोळवतोस....*
*झोपडीवरील छत माझे*
*चोरून संगे नेतोस...*
*तू मारलेल्या गारांनी*
*बघ पिकं झाली लुळी* *||४||*
*यावेळी सुद्धा मित्रा मी*
*पेरले होते स्वप्न.......*
*काही दिवसांवर येऊन ठेपलेले*
*माझ्या लाडक्या लेकीचे लग्न*
*कर्ज जाईल वाढत माझं*
*अनं लाचारीचं जगणं भाळी* *||५||*
*तुला खुश ठेवण्यासाठी*
**सांग कोणतं नवस फेडू*
*इवल्या या पोटासाठी..*
*आणखी किती लढू...*
*हृदयातून विनंती तुला*
*तू भेट फक्त मान्सूनवेळी* *||६||*
