मंगळागौरी
मंगळागौरी
नवविवाहित सौभाग्यवती पुजती पार्वतीला...
सौभाग्याचं लेणं मागती गौरी शंकराला...||धृ||
स्नान करून पुजती मूर्ती घरी पार्वतीची...
त्या पूजती पिंडीला पाने वाहती बेलाची...
अशा व्रतवैकल्याने मना लाभते चैतन्य...
होतं सार दुःख दूर मन राहते प्रसन्न...
अशा निर्मळ भक्तीने सुखं लाभते घराला ..||१||
नववारी लुगडं नेसून साज त्या करती..
हातामध्ये हिरवा चुडा आनंदाने भरती...
नाकामध्ये नथ घालून भांगही भरती....
साऱ्या मंगळागौरीला अशी तयारी करती...
असा थाट देई सुखं त्या संसाराला..||२||
बाया करती उपवास निर्मळ निराहार..
सडा सारवण करून कशा सजवती घरं...
अंगणी तुळस पुजून करती नमन तुळशीला..
अर्घ्य वाहती त्या नित्य त्या सुर्यनारायनाला...
मनोभावे करती पूजा सुख लाभावे घराला....||३||
सदा घरात गुंतलेलं तिचं निर्मळ मन...
मंगळागौरी आहे तिच्या साफल्याचा क्षण...
या सणाला महिला खेळती बहुविध खेळ...
व्हावा व्यायाम शरीराचा व्हावे प्रसन्न मन...
साऱ्या मिळून लुटती खेळातून आनंदाला....||४||
