व्रतवैकल्ये
व्रतवैकल्ये
1 min
192
श्रावण सणांचा राजा
येतो घेऊन सुखाला
आया बाया पुजती
नित्य गौरी शंकराला
मांदियाळी मंदिरात
भक्तांची सोमवारी
नववधू त्या करती
व्रत नाव मंगळागौरी
आली आली नागपंचमी
सन आला नागदेवाचा...
नागराजा मित्र सदा...
साऱ्या शेतकऱ्यांचा...
येते नारळी पौर्णिमेला
भावा बहिणींचा सण
बहीण ओवाळे भावाला
जाते मन भारावून
कोळी समुद्रा पुजती
साथ देशील सागरा
परतु दे सुखरूप..
आम्हा आमच्या घरा
सोमवार शुक्रवार अनं
पौर्णिमा अमावस्या...
मांगल्य लाभते घराला
साऱ्या मिटती समस्या
गौरी गणपती सत्यनारायण
वैद्य नवमीला पारायण...
पोळा पिठोरी अमावस्या
माझ्या मांगल्याचे क्षण...
