STORYMIRROR

Mangesh Gowardhan

Others

3  

Mangesh Gowardhan

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
111

ओलाचिंब गारगार

भिजूनी पावसात

प्रेमगीत भाळतोय

वेडा तुझ्या प्रेमात.||धृ||


बरसणाऱ्या सरींनी

चेतवलंय मनाला..

वेडं पाखरु मन माझं

आठवतंय तुला....

ढोल ताशे तालात

 वाजू लागलेत नभात..||१||


सळसळणारा वारा

तनाला स्पर्शून जातो

एक अलौकिक आनंद

पाऊस देऊन जातो

गंध तुझा उरतो बाकी

सखे माझ्या ह्रदयात..||२||


पंख घेऊन ढगांचे

दूर नभी जाऊन

रूप चांदण्यांचं..

पहावं निरखून

तुला शोधत बसावं

चांदण्यांच्या राज्यात.. ||३||


ओढून घ्यावं तुला कवेत

पावसात भिजण्यासाठी

आठवणींची शिखरे... 

उभी करण्यासाठी....

पहिला पाऊस असतो

 खूप महत्वाचा प्रेमात.....||४||


Rate this content
Log in