तुझ्या सोबतीने
तुझ्या सोबतीने
किती पावसाळे,उन्हाळे,हिवाळे
गाठले जरी मी,तुझ्या सोबतीने
प्रवास मजला हा,नवा वाटतो...
चालले कितीही जरी,तुझ्या सोबतीने.......||धृ||
नयणांस माझ्या तुझे रूप हे
मोहून गेले तुझ्या पाहण्याच्या
सुखावे सदा तुझ्या येण्याची चाहूल..
आनंद झाला मला,तुझ्या येण्याने..
कळेना मला का नाराज मन हे
तुझ्या अशा थोड्या दूर जाण्याने......||१||
वाटेत आली किती संकटेही
भय ना कसलेही तुझ्या असण्याने
वाटेवरील काटे जणू फुले ती
सोसिले तयांना खंबीर पायाने
थकलो जरी मी हा भार सोसताना
आधार दिला मजला तुझ्या शब्दाने......||२||
तुझ्या बोलण्यातील मकरंद हा
चाखिला आहे माझ्या ह्रदयाने
खुणावून नजरेने इशारा तू केला
घायाळ झालो तुझ्या नजरेने..
शब्द काही आता सुचेनात मजला
निशब्द केले तुझ्या प्रेमाने...||३||
माझ्या दुःखाना कवटाळून तू
सुखं संसारात तू मजला दिले
सावलीपरी माझ्या सोबतीला तू
जीवनास नवे माझ्या आयाम दिले
प्रवास तुझाही आहे खडतर
लढते आहेस तू खूप संयमाने...||४||
