आभाळाचं प्रेम
आभाळाचं प्रेम
खाऊन पिऊन फुगले
आभाळातील ढग....
वजन कमी करण्याची
चालू झाली लगबग....
निळभोर आभाळ
झालं काळाकुट्ट...
जसा वकिलाने बघा
घातला आपला कोट
वाजतगाजत जशी
मिरवणूक निघाली
तशी ढगांमधून...
विजा बाई चमकली
म्हणे नभ आणि धरेच
सुरू झालं भांडण...
गोऱ्यागोमट्या गारांनी
भरून गेलं आंगण....
शेतात सारीकडे
पीक सडलेले....
जसे सैनिक सीमेवर
धारातीर्थी पडलेले....
समजत नाही आता
चालू कोणता ऋतू..
आभाळाचं प्रेम...
धरतीवर जातंय उतू..
ओढून घेऊ शाल
की घेऊ रेनकोट..
थंडी घेऊन चालतेय
ढगांचा बोट....
कधी थांबेल एकदाचा
हा पाऊस अवकाळी
दर्शन घेता येतील
सूर्याचे सकाळी सकाळी....
