STORYMIRROR

Mangesh Gowardhan

Others

3  

Mangesh Gowardhan

Others

माऊली साधीभोळी

माऊली साधीभोळी

1 min
135

रगरगत्या उन्हांत

डोईवर घेऊन मोळी

घराकडं चालली

माऊली साधीभोळी••||धृ||


आग ओकत आहे

हा सूर्यनारायण....

पाय भाजत आहे

सडक ही गरम...

तंग झाली घामाने

तिची ही चोळी•••||१||


वाट तिची बघतंय

इवलंस तान्ह मूल

सरपण नाहीत घरी

पेटवण्या तीला चूल

कमावण्या गेलाय

तिचा घरचा गडी..||२||


जाऊन घरी लवकर

उरकायची ती कामं

थकलेल्या जीवाला

घ्यावा थोडा आराम

शिवून घ्यायची आहे

तिला फाटलेली साडी..||३||


धनी येता घरी देणे..

आंघोळीला पाणी...

दोन शब्द प्रेमाचे 

अनं सोबत चहापाणी..

विचार करत चाललीय

काम बाकी सगळी...||४||


कष्ट संगे करतेय ती..

लेकरांनी सुखात जगावे.

शिकून त्यांनी व्हावे मोठे

नाव आमचे कमवावे...

निघणार कशी लेकरं ती

काय लिहिलंय भाळी..||५||


Rate this content
Log in