श्रावण सोमवार
श्रावण सोमवार
श्रावणातील सोमवारी नित्य
निर्मळ निराहार उपवास....
व्रत करती महिला साऱ्या
करून महादेवाचा ध्यास...
पूजा ठरते फलदायी अशी
निज श्रावणातल्या सोमवारी
प्रातः स्नान उरकून महिला
पाऊले मंदिराच्या वाटेवरी
जोडा शंकर पार्वतीचा
आदर्श सुखी संसाराचा
आशीर्वाद पाठी असावा
हेतू हाची उपवासाचा...
जरी कठोर ते व्रत
सया करती जपून
भाव वाहती देवाला
बेलपत्र ते वाहून...
भक्तीचा गजर मंदिरात
नित्य ऐकू येते कानी
व्हावे भक्तीत तल्लीन..
भक्तिभाव वाहे मनीं..
असा श्रावण सोमवार
मनी पावन विचार...
फुलली तुळस अंगणी
सुखावली घर दारं....
