एक प्रवास लेखणीचा स्टोरीमिररचा
एक प्रवास लेखणीचा स्टोरीमिररचा
साहित्याच्या विश्वात लेखणाच्या विविध छटांनी
सजलेला स्वर्गच जणू प्रवास स्टोरीमिररवरचा..
शब्दांने भरलेली ओंजळ रीक्त झाली
शब्दरुपी भावना व्यक्त झाली प्रवासात स्टोरीमिररच्या...
विचारांना फुटता पंख,लेखणाला मिळते तेज
आत्मविश्वास मिळाला प्रवासात स्टोरीमिररच्या..
अनेक नवोदितांना संधी देणारा बनतो
विचारांचे शब्दांशी सुत जोडतो प्रवास स्टोरीमिररचा..
उत्साहाचा अखंड स्त्रोत बनतो
आनंदाचा झराही वाटतो प्रवास स्टोरीमिररचा...
छोट्या मोठ्या साऱ्यांना सामावून घेणारा
प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणारा वाटतो
प्रवास स्टोरीमिररचा..
लिखाणाला नवी पायवाट मिळाली
समविचारी, सकारात्मकतेची शाश्वती
देणारा प्रवास स्टोरीमिररचा...
उत्तरोत्तर वाढावा किर्तीचा आधारवड
स्वतः बरोबर पारंब्यानाही विकासाकडे घेऊन जाणारा
प्रवास स्टोरीमिररचा...
