कुछ तो लोग कहेंगे.
कुछ तो लोग कहेंगे.
जेव्हा चार भिंतींच्या पलीकडे जाऊनस्वतः ची स्वप्ने पूर्ण करायला जाशीलतेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
चाकोरीबद्ध जिवनातुन बाहेर निघु पाहशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे"
खंबीर होऊन स्वतः चे अस्तित्व निर्माण करशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
बुरसटलेल्या विचारांना जर का छेद देशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
वर्षोनुवर्षे सहन करत आलेल्या
अन्यायाविरुद्ध आवाज उठवशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
सतत कुटुंबासाठी राबणारी तु अचानक स्वतः साठी जगायला लागशील
"तेव्हा कुछ तो लोग कहेंगे."
फक्त एक स्त्री म्हणून सर्वांच्या मनाप्रमाणे वागणारी
तु स्वतःचा स्वाभिमान जपु पाहशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
पिढ्यान् पिढ्या परंपरांच्या नावाखाली दाबली गेलेली तुझी हुशारी आणि ज्ञान जर का पाझळशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
स्वतः च्या आनंदासाठी, जगाबरोबर चालण्यासाठी
स्वतः साठी सजशील,नटशील, अप टु डेट राहशील
तेव्हा "कुछ तो लोग कहेंगे."
कधीतरी मनमोकळी हसशील, बोलशील, बाहेर फिरायला जाशील तेव्हा बाहेरचे काय घरातले लोकं सुध्दा बोलतील अरे हिला अचानक काय झाले..
आणि या सर्वांचा विचार करुन तु पुन्हा हिरमसुन जाशील, स्वतः चे आयुष्य जगणे सोडुन देशील??
आतल्या आत घुसमटशील??
की, झुगारून देशील या सर्व शब्दांना आणि बेड्यांना
कधीतरी तु स्वतःलाच प्रश्न विचारशील
माझ्या आयुष्याचा रीमोट मी का दुसऱ्याच्या हातात देऊ कारण हा संवेदनाशून्य समाज माझ्या मनाला कधीच समजुन घेणार नाही..
म्हणून मी स्वच्छंदी राहणार सोडुन देणार विचार आता सर्वांचा कारण हे जग आहे आपण कसेही रहा हे बोलणारच..
"कुछ तो लोग कहेंगे,लोगो का काम हे केहना!"..
