नदी
नदी
नदी आणि बाई तशी मला सारखीच वाटते.
शांत, निस्वार्थी, धीरगंभीर,
उत्साही, कर्तव्यदक्ष , तत्पर
परोपकारी पण तरीही अखंड वाहणारी
सर्वांना सामावून सहनशिलतेची पातळी पार करणारी
नदी आणि तिच्यात नक्कीच साम्य आहे.
झाले गेले मागे सोडत
प्रवाहा सोबत चालणारी
आणि निरंतर वाहणारी
पण तरीही तिचे अस्तित्व
अन् वेगळेपण जपणारी
ती आणि नदी तशी सारखीच...
