जीवन
जीवन
जीवन सारे जगतांना
नियम सारे पाळावे लागतात
मनासारखे नसले तरीही
खेळ सारेच खेळावे लागतात.
असो जिंकणारे वा हरणारे
डाव सारेच मांडांवे लागतात
कधी वाटतो खेळ संपला
जिंकलो आपण एक डाव
पण पुढच्याच क्षणी
नव्या अडचणी,नवे दुःखे
नव्या भिडुच्या रुपाने समोर ठाकतात
कधी कधी गहिवर दाटला जरी
उसने हसू घेऊन चेहऱ्यावरी
जीवनाच्या पुढच्या खेळाला तयार रहावे लागते
तेही समाजाच्या नियमांचे पालन करुन
