पिंपळाचा पार
पिंपळाचा पार
शहराकडे धाव साऱ्यांची
माणसांची वर्दळ हल्ली नसते फार
गाव ओस पडु लागले
सुना झाला तो पिंपळाचा पार..
तरुणांच्या गप्पा टप्पा
वृद्धांचा सुखदुःख वाटण्याचा आधार
सुना झाला तो पिंपळाचा पार..
मनसोक्त खेळणारी लहान मोठी पोरं
उगाच गर्दी असायची न्हाव्याच्या टपरीवर
सुना झाला तो पिंपळाचा पार...
आधुनिकीकरण वाढले
हळूहळू गाव ही शहरात सामावु लागले
जंगलतोड वाढु लागता वृक्ष दिसेनासे झाले
एखाद्या वळणावर कुठेतरी
एकटा उभा तो जुना पिंपळ दिसतो
पण माणसांची वर्दळ हल्ली नसते फार
सुना झाला तो पिंपळाचा पार...
